Breaking news

Ganesh Jayanti l लोणावळा शहरात सर्वत्र माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी

लोणावळा : लोणावळा शहर (Lonavala City) व परिसरात सर्वत्र माघी श्री गणेश जयंती (Ganesh Jayanti) अर्थात विनायक चतुर्थी मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने साजरी करण्यात आली. सर्वत्र गणपती मंदिरामध्ये सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बारा वाजता गणेश जयंतीचा सोहळा पार पडला. मंदिरामध्ये पाळणा लावत त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवत जन्मसोहळा व तदनंतर बाळ जन्माचा पाळणा म्हणत महिला भगिनींनी जन्मोत्सवाचा जल्लोष भक्ती भावाने साजरा केला.

     मागील तीन दिवसांपासून माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गणपती मंदिरांमध्ये करण्यात आले होते. आज देखील सर्वत्र गणेश याग, होम हवन, सत्यनारायण महापूजा, श्री गणेश आवर्तने, श्री गणपती बाप्पांची भजने, किर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भांगरवाडी येथील श्री गणपती मंदिरामध्ये मागील तीन दिवसापासून विविध धार्मिक स्वरूपाची कार्यक्रम सुरू आहेत. आज देखील दुपारी गणेश जन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कुसगाव वाडी येथील श्री प्रकाश पाठारे यांच्या श्री गणपती मंदिरात देखील गणेश जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मोठ्या प्रमाणात महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या. जन्म सोहळ्यानंतर महाप्रसाद व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शेजारीच असलेल्या भैरवनाथ नगर येथील श्री गणपती मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अंबरवाडी येथील गणपती मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बारा बंगला, गवळीवाडा, रायवुड, गावठाण अशा विविध ठिकाणी माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.


इतर बातम्या