Breaking news

Big News l लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केला कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा चुराडा !

लोणावळा : लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकली, वाहनांच्या काचांना ब्लॅक फिल्म लावणे, हेल्मेट न वापरणे तसेच चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर न करणे अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये एकूण रु. ५४,५००/- इतका दंड करण्यात आला.

वाहतूक नियमांचे पालन करणे, रस्त्यावरील शिस्त राखणे, ध्वनिप्रदूषणाला आळा घालणे तसेच वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा उपविभाग गजानन टोणपे, यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक भूषण माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे, पोलीस हवालदार भूषण कदम, पोलीस हवालदार विनोद गवळी, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुदळे, पोलीस कॉन्स्टेबल यश देसाई, पोलीस मित्र अनिल लोंढे, विनोद विकारी, विक्रम येवले व वाजे यांनी केली.

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, दुचाकी चालविताना हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करावा. वाहनांमध्ये अनधिकृत ब्लॅक फिल्मचा वापर करू नये तसेच कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर टाळावा. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

इतर बातम्या