Lonavala Rotary Club : संक्रांतीचे वाण म्हणून त्यांनी पर्यावरणपूरक पिशव्यांचे केले वाटप

लोणावळा : मकरसंक्रांत ते रथसप्तमी दरम्यान सर्वत्र महिलांचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम होत असतात. याचे निमित्त साधत लोणावळ्यात रोटरी क्लबच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात आलेल्या महिलांना त्यांनी पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या कार्यक्रमात 350 महिलांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाचे नियोजन रो. फर्स्ट लेडी श्वेता मेहता व शरयू कुलकर्णी यांनी केले होते. तसेच रो. नंदिनी बॅनर्जी, रो. ब्रिंदा गणात्रा, रो. वैशाली साखरेकर, रो. विजया कल्याण व प्रतिभा नलोडे, विमल चौधरी, कल्पना शारवाले, आरती अरगडे, आशा वानखेडे, नीता पवार यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला.