Lonavala Rain Information l लोणावळा शहरात 8 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 21 मिमी पावसाची नोंद
लोणावळा : मागील महिनाभर जोरदार कोसळल्यानंतर लोणावळा शहरात पावसाचा जोर कमी झाला आहे. 8 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात लोणावळा शहरात 21 मिमी (0.83 इंच) पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळा शहरात यावर्षी आज अखेरपर्यंत 4632 मिमी (182.36 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत 3921 मिमी (154.37 इंच) पाऊस झाला होता. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे लोणावळा शहरात पूर आला होता. जवळपास 2 हजार कुटुंब या पुरामुळे बाधित झाली. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने लोणावळा शहरावर दुसरे पूर संकट आले होते. सुदैवाने पावसाने उघडीप घेतली व ही संकट टळले. तूर्तास तरी पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र पहिल्या पुरात नुकसान झालेल्या नागरिकांना महिना उलटला तरी कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही. केवळ पंचनामे करण्यात आले आहेत.



















