Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात 6 ऑगस्ट 26 रोजी 24 तासात 41 मिमी पावसाची नोंद; आजपर्यंत 180 इंच पाऊस

लोणावळा : लोणावळा शहरात 6 ऑगस्ट 2026 रोजी 24 तासात 41 मिमी (1.61 इंच) पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधून मधून पावसाच्या जोरदार सरी व रिमझिम पाऊस हा सुरू आहे.

लोणावळा शहरात यावर्षी मान्सूनने उशिरा हजेरी लावून देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. यावर्षी आज अखेरपर्यंत लोणावळा शहरामध्ये 4582 मिमी (180.39 इंच) एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेरपर्यंत लोणावळा शहरांमध्ये 3905 मिमी (153.74 इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी आजपर्यंत जवळपास 27 इंच अधिकचा पाऊस झाला आहे. एल निनो च्या प्रभावामुळे यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होईल अशा चर्चा सुरू असताना पावसाने मात्र जोरदार हजेरी लावत सर्व चर्चा व निष्कर्ष पुराच्या पाण्यासोबत वाहून नेले आहेत. पावसाला अजूनही दोन महिने शिल्लक असल्यामुळे लोणावळ्यात यावर्षी जास्त पाऊस नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर बातम्या