Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात ऑगस्ट अखेरपर्यंत 204 इंच पावसाची नोंद; 1 सप्टेंबर रोजी 24 तासात 19 मिमी पाऊस

लोणावळा : लोणावळा शहरात ऑगस्ट 2026 अखेर पर्यंत 5193 मिमी (204.45 इंच) इतका पाऊस झाला आहे. 1 सप्टेंबर 2026 रोजी 24 तासात शहरात 19 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

      लोणावळा शहरात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर कायम राहिला त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला होता. 

लोणावळा शहरात जून 2026 मध्ये 473 मिमी (18.62 इंच) पाऊस झाला होता. जुलै 2026 मध्ये 3656 मिमी (143.94 इंच) पाऊस झाला तर ऑगस्ट 2026 मध्ये 1045 मिमी (41.14 इंच) पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात अल निनो मुळे पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

इतर बातम्या