Breaking news

Lonavala News : आँक्झिलियम शाळेसमोर सापडली घोरपड

लोणावळा : रायवुड विभागातील आँक्झिलियम शाळेसमोरील एका बंगल्यात मोठी घोरपड मिळून आली आहे. लोणावळ्यातील शिवभक्त व प्राणीमित्र मनोहर ढाकोळ यांनी सदरची घोरपड पकडत ताब्यात घेतली. ती तुंगार्ली धरण परिसरातील जंगल भागात तीला तीच्या नैसर्गिक आधिवासात सोडण्यात येणार असल्याचे ढाकोळ यांनी सांगितले. ढाकोळ म्हणाले, आँक्झिलियम शाळेसमोरील एका बंगल्यामधून आज दुपारी एक फोन आला ही येथे घोरपड आली आहे. तात्काळ त्याठिकाणी जाऊन घोरपड ताब्यात घेतली आहे. सदरची घोरपड ही मोठी व जुनी असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या