Breaking news

कोथुर्णे अपहरण व खून प्रकरण; आरोपी मुलगा व त्याला पाठीशी घालणार्‍या महिलेला फासावर चढवा - विद्या चव्हाण

पवनानगर : मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी पिडित मयत मुलीच्या घरी येऊन तीच्या आई वडिलांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या, मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात अशी घटना घडली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून या घटनेचा मी निषेध करते. जी महिला गावामध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करते आणि तिचा या घटनेमध्ये सहभाग आहे, ही घटना काळीमा फासणारी आहे. आरोपी महिलेला व तिच्या मुलाला फासावर चढवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी मोबाईल व सोशलमिडीया यावर काही निर्बंध आणले पाहिजे असे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत महिला राज्य आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरघे, उपप्रदेशाध्यक्षा दिपाली पांढरे, विभागीय अध्यक्ष रायगड जिल्हा अर्चना घारे, जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, निरिक्षक पुणे जिल्हा लोचन शिवले, राज्य सरचिटणीस रुपाली दाभाडे, निरिक्षक पिंपरी चिंचवड शितल हगवणे, मावळ माजी अध्यक्षा सुवर्णा राऊत, मावळ अध्यक्षा दिपाली गराडे, संध्या थोरात, उमा शेळके, मंगल मुर्‍हे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या

समाजसेवेचा सुंदर उपक्रम l डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती अनुजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि अनाथाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप