Breaking news

मुसळधार पावसाने लोणावळा धरणाच्या जलाशयात वाढ; नागरिकांनी काळजी घ्यावी

लोणावळा : लोणावळा शहर परिसरात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने लोणावळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणाच्या द्वारविरहित सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असा इशारा टाटा पाॅवरचे धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिला आहे.

    लोणावळा धरण जलाशय पातळी आज बुधवारी सायंकाळी 5 वाजता 623.88 मी. होती तर जलाशय साठा 8.858 द.ल.घ.मी. (58.74%) आहे. धरण पाणलोट क्षेत्रात 2 दिवसांपासून जास्त पाऊस होत आहे. आज 8 तासांत लोणावळा धरणावर 114 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

   राज्यात पुढील 2-3 दिवस अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. टाटा कंपनीकडून महत्तम क्षमतेने (800-850 Cusecs) धरणातील पाणी वीजनिर्मितीकरिता खोपोली वीजगृहात वळविण्यात येत असून, धरण जलाशयातील सद्यस्थितीतील सरासरी आवक 1600-1700 cusecs ने येत आहे. त्यामुळे धरण जलाशय पातळीमध्ये वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता आहे आणि द्वारविरहित सांडव्यावरून अनियंत्रित विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. याकरिता सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या