Breaking news

मावळ तालुक्यात आज सोमवारी कोरोनाचे 29 नविन रुग्ण तर 35 जणांना डिस्चार्ज

वडग‍ाव मावळ : मावळ तालुक्यात आज सोमवारी (02 आँगस्ट) कोरोनाचे नविन 29 रुग्ण मिळून आले आहेत. तर कोरोनावर मात केलेल्या 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे मावळातील कोरोना रुग्णसंख्या कमी होऊन 470 झाली आहे. मावळ तालुका आरोग्य विभागाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेली ही आकडेवारी आयसीएमआर कडून प्राप्त झालेल्या अहवालावरून देण्यात आली आहे. 

        मावळ तालुक्यात आतापर्यत कोरोनाचे एकूण 26026 रुग्ण झाले असून यापैकी 25040 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर आजपर्यत मावळात 516 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96.21 टक्के असून सक्रिय कोरोना रुग्णांचा दर 1.81 टक्के व मृत्यूदर 1.98 टक्के इतका आहे. 

    मावळ तालुक्यात शहरी भागात आज 12 तर ग्रामीण भागात 17 रुग्ण मिळून आले आहेत. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात 61 गावांमध्ये कोरोना रुग्ण असल्याने मावळातील सर्व गावे कोरोनामुक्त करण्याचे मोठे आवाहन तालुका प्रशासना समोर आहे. 

मावळ माझा बातमीपत्राचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

इतर बातम्या