Breaking news

MP SHRIRANG BARNE । आई एकविरा देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची बैठक लावा - खासदार श्रीरंग बारणे

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान असलेल्या आई एकविरा देवीची यात्रा येत्या 27 व 28 मार्च रोजी वेहेरगाव येथील कार्ला गडावर होणार आहे. या यात्रेच्या नियोजनाची बैठक लावत यात्रेचे योग्य प्रकारे नियोजन करावे, भाविकांना सुलभतेने दर्शन होईल याची काळजी घ्यावी, येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची गर्दी रोखण्यासाठी वाहन तळाची, पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करावी, गडावर जाताना येताना अपघात होणार नाही, यात्रा काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी व त्या अनुषंगाने करण्यात येणार्‍या उपाययोजना व नियोजनासाठी स्थानिक ग्रामस्त प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, श्री एकविरा देवस्थानचे विश्वस्त, पुजारी, पोलीस प्रशासन व इतर शासकीय यंत्रणा यांची संयुक्त बैठक लावावी अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.इतर बातम्या