Breaking news

Lonavala Heavy Traffic l मिसिंग लिंकनंतरही लोणावळा शहर आणि परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी कायम; आषाढाच्या शेवटच्या रविवारी ८ ते १० किमी रांगा

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोणावळा शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल, असा दावा शासनाकडून करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र पूर्णपणे वेगळे असून मागील तीन दिवसांत लोणावळ्यात झालेली अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहता शासनाचा हा अंदाज सपशेल चुकीचा ठरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरासाठी प्रचंड वाहतूक कोंडीचा ठरला असून, पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा जनसागर उसळला होता.

आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार लोणावळा शहर व ग्रामीण भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा ठरला. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाकसाई फाटा ते पाथरगाव दरम्यान वाहनांच्या रांगा गेल्यामुळे आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग कोंडीमय झाला होता. लोणावळा शहरात देखील सेंटर पॉइंट हॉटेल ते नाझर कॉर्नर पर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्रमाणेच लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सर्व पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते वाहतूक कोंडीमुळे ठप्प झाले होते. वाहतूक कोंडीमुळे संडे हा वाहतूक कोंडीमुळे झाला होता. अगदी किरकोळ अंतरासाठी तासान तास वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला स्थानिक नागरिकांना देखील या कोंडीमुळे घरातून बाहेर पडणे देखील मुश्किल झाले होते.

शुक्रवार, शनिवार, रविवार हे तीनही दिवस लोणावळा शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. पर्यटकांच्या या गर्दीमुळे सर्व भागातील हॉटेल्स खाजगी बंगले व फार्म हाऊस तुडुंब भरले होते. पर्यटन स्थळांवर देखील प्रचंड गर्दी झाली होती. पर्यटकांच्या या गर्दीमुळे व त्यांच्या वाहनांमुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा ते पाथरगाव दरम्यान जागोजागी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. लोणावळा ते पवनानगर या मार्गावर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलीस प्रशासनाच्या नाकी नऊ आले. मात्र वाहनांची संख्याच एवढी मोठी होती की ती कोंडी सुटता सुटत नव्हती. पर्यटन स्थळांवर तर अक्षरशः पाय ठेवण्यास देखील जागा शिल्लक नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली होती. येत्या गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे याकरिता आषाढ महिन्यातील हे शेवटचे शनिवार-रविवार व त्याचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या पार्ट्या करण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागात तसेच पवनानगर परिसरामध्ये हे पर्यटक आले होते.

इतर बातम्या