मोठी बातमी l लोणावळ्यात जुन्या खंडाळा परिसरात भीषण भूसखलन; एकाचा मृत्यू, एक अद्याप बेपत्ता, १४ जणांना वाचवण्यात यश
24 तास मातीच्या ढिगाऱ्याखाली होता मृतदेह
लोणावळा : लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुना खंडाळा येथील रस्टिक हायलँड, नॉर्थ पॉइंट आणि 360 सर्कल परिसरात ६ जुलै २०२६ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन (लँडस्लाइडिंग) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून एका पर्यटकाचा/नागरिकाचा मृत्यू झाला असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर राबवलेल्या बचावकार्यामुळे १४ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले
आहे.






















