Breaking news

निधनवार्ता । व्हिपीएस नियामक मंडळाचे अध्यक्ष गोवर्धन शिंगरे उर्फ बाबा यांचे निधन

लोणावळा : विद्या प्रसारणी सभेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. गोवर्धन शिंगरे उर्फ बाबा यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. बाबा यांनी मागील अनेक वर्ष व्हिपीएस शाळा, महाविद्यालय, इंजिनिअरिंग काॅलेज यांचे कामकाज सांभाळले व वाढवले. नुकतेच वाकसई येथे फार्मसी काॅलेजची मान्यता मिळवून घेत शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. लोणावळा शहरातील व्हिपीएस शाळेत अनेक विभाग व ग्रामीण भागात अनेक शैक्षणिक शाखा सुरु केल्या. त्यांच्या निधनाने विद्या प्रसारणी सभेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सायंकाळी 6.30 वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मावळ माझा न्युज परिवाराकडून बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

इतर बातम्या