Breaking news

मावळ तालुक्यात बिबट्याचा मुक्तसंचार; सांगिसे गावाजवळ तीन बिबटे असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

लोणावळा : मावळ तालुक्यामध्ये सध्या बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. कामशेत जवळील सांगिसे या गावाजवळ काल नागरिकांनी बिबट्या पाहिला. या भागात तीन बिबटे असल्याचे नागरिक सांगत आहेत. यापूर्वी देखील चांदखेड, पवनानगर, राजमाची, कान्हे फाटा या भागांमध्ये बिबट्याचे दर्शन झाले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर वरील घटनांवरून मावळ तालुक्यात अनेक भागांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

     डोंगर भागाला लागून असलेल्या गावांमध्ये हे बिबटे शिकारीच्या शोधांमध्ये येत असल्याचा अंदाज आहे अनेक गावांमध्ये पाळीव प्राणी हे बाहेर गोठ्यामध्ये असतात बिबट्याच्या मुक्त संचार यामुळे त्यांच्या जावेताला धोका होऊ शकतो तसेच रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणे नागरिकांच्या जीवावर भेटू शकते काल सांगीसे गावात बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशिल मंतावर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी वर्गाने परिसरामध्ये शोध मोहीम राबवली तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करत रात्रीच्या वेळी शक्यतो एकटे घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन केले आहे.

इतर बातम्या