Breaking news

माजी नगराध्यक्ष अमित गवळी यांनी घेतली गोविंद बाग येथे शरद पवार यांची भेट

मावळ माझा न्युज नेटवर्क : लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष अमित गवळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांची त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अमित गवळी व शरदचंद्र पवार यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास मावळ विधानसभेच्या बाबत चर्चा झाली. आगामी काळामध्ये लोणावळा शहरात अमित गवळी यांना बळ, ताकद व आर्शिवाद देण्याचे आश्वासन यावेळी शरदचंद्र पवार यांनी दिले असल्याचे अमित गवळी यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सांगितले.

     माजी नगराध्यक्ष अमित गवळी आज त्यांच्या शेकडो समर्थकांसह बारामती येथील गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. यावेळी श्री पवार यांनी अमित गवळी यांच्याशी जवळपास अर्धा तास विविध विषयांवर चर्चा केली. मावळ विधानसभेची सद्यस्थिती त्यांच्याकडून जाणून घेतली. तसेच येणाऱ्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये लोणावळा शहरात अमित गवळी यांना पक्षाची ताकद व बळ देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. मावळ विधानसभेमध्ये शरद पवार पक्षाकडून अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. अमित गवळी हे बापूसाहेब भेगडे यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट व चर्चा महत्त्वाची ठरली आहे. अमित गवळी नगराध्यक्ष असताना त्यांनी लोणावळा शहरांमध्ये विविध विकास कामे केली आहेत. मागील काही दिवसांपासून ते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र पुन्हा सक्रिय राजकारणात ते सहभागी झाले असल्याने येणाऱ्या काळात ते विरोधकांसमोर तगडे आवाहन निर्माण करतील. त्यातच शरद पवार साहेबांची ताकद त्यांच्यासोबत राहणार असल्याने त्यांचे राजकीय वजन लोणावळा शहरांमध्ये निश्चितच वाढणार आहे. लोणावळा शहरामध्ये अमित गवळी यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

    




इतर बातम्या