Breaking news

Pawnanagar News : अवकाळीची अवकळा; शेतीचे मोठे नुकसान तर येळसे गावात वीज पडल्याने चारा जळून खाक

पवनानगर (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यात गुरुवारी (16 मार्च) झालेल्या आवकाळी पाऊसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. येळसे गावात वीज पडल्याने जनावरांचा साठविलेला चारा जळून खाक झाला आहे. गुरुवारी सायंकाळी वाऱ्या सह विजेच्या कडकटात मोठ्या प्रमाणावर आवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये येळसे गावातील शेतकरी सुभाष खंडू कडू यांच्या शेतातील जनावरांनसाठी साठवून ठेवलेल्या गुरांच्या चाऱ्यावर विज पडून चारा भसमसात झाला आहे. तसेच पवनमावळ भागातील गहू, हरभारा, काकडी, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये पाणी साठून राहिले आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने बळीराजाच्या संकटात भर पडली आहे. अवकाळी पावसामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले असल्याने शासनाने तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

सुभाष कडू - शेतकरी : गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर वीज कोसळल्याने चाऱ्याला आग लागून संपुर्ण चारा जळून गेला आहे. तसेच गहू, काकडी, मका व टोमॅटो पिकांचे मोठे नुसकान झाले आहे. गहू दोन आठवड्यात काढणीला आला होता तर टोमॅटो ला फुले लागली होती पावसामुळे सर्व फुले गळाली असल्याने आतातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे.

इतर बातम्या