लोणावळा शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीम अनुयायांना रेल्वे स्थानकावर चहा बिस्किट व पाणी बॉटल चे वाटप
लोणावळा : विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर, वंचित बहुजन महिला आघाडी लोणावळा शहर यांसकडून चैत्यभूमीला अभिवादन करण्यास जाणाऱ्या भीम अनुयायांना रात्री नऊ ते दीड वाजेपर्यंत लोणावळा रेल्वे स्टेशन या ठिकाणी चहा, बिस्कीट व पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे लोणावळा शहर अध्यक्ष लोकेश भडकवाड, भारतीय बौद्ध महासभा लोणावळा शहराध्यक्ष राजेंद्र अडसुळे, कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे, मावळ तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रवीण रोकडे, विशाल कांबळे, रोहन कांबळे, अब्दुल भाई शेख, मुरलीधर सरोदे, रोहन गायकवाड, अनिल धेंडे, विशाल गायकवाड, सुमित घोडके, अभिजीत धांडोरे, अनुज सरवते, भीमसेन भालेराव, प्रदीप सोनारीकर, महिला आघाडीच्या अंजली कांबळे, नीता गायकवाड, रमा वाघे, मंगल आखाडे, वनिता भडकवाड, शर्मा मॅडम, काजल धांडोरे आदी महिला उपस्थित होत्या.