Breaking news

मोठी बातमी; एकविरा देवी व वाघजाई देवी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

लोणावळा : शनिवार व रविवार च्या सुट्टयांमुळे कार्ला गडावरील आई एकविरा देवी व खंडाळा घाटाच्या माथ्यावर असलेली वाघजाई देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नवरात्र उत्सवातील आज देवीची सातवी माळ असल्याने देवीचे दर्शन घेण्यासाठी कार्ला व खंडाळ्यातील दोन्ही शक्तीपीठ‍ंचे दर्शन घेण्यासाठी लोणावळा व मावळ तालुक्यासह राज्यभरातून भाविक आले आहेत. मुंबई रायगड भागातील भाविकांची संख्यात यात मोठी आहे. कार्ला गडावर भाविकांची होणारी संभाव्य गर्दी ध्यानात घेता पुणे ग्रामीण व लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने 16 पोलीस अधिकारी, 100 पोलीस जवान, एसआरपी, आरसीपी, कमांडो व बीडीडीएस यांचे प्रत्येकी एक पथक असा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. कार्ला गडावर गर्दी वाढल्याने पायर्‍यांवर चेंगराचेंगरी होऊ नये याकरिता भाविकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काही भाविक पायर्‍यांवरील गर्दी टाळण्यासाठी थेट डोंगरावरुन पायी वाटेने मंदिराकडे जात आहे. ही पायवाट धोकादायक असल्याने भाविकांनी खबरदारी घ्यावी, अनावश्यक धाडस करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. वाघजाई मंदिरात खाजगी सुरक्षा रक्षक ट्रस्टच्या वतीने नियुक्त करण्यात आले आहे. कार्ला परिसरात मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर पायथ्यापासून कार्ला फाट्यापर्यत वाहनांच्या रांगा आल्या आहेत.

मावळ माझा न्युजचा वाॅटसअप ग्रुप जाॅईन करा व मिळवा बातम्यांचे अपडेट्स क्षणाक्षणात

इतर बातम्या