Breaking news

आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरणार मावळच्या मैदानात

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख असलेले देवेंद्र फडणवीस हे मावळच्या मैदानात उतरणार आहेत. महाराष्ट्र मध्ये महायुतीचा मुख्यमंत्री करायचा आहे. याकरिता महायुतीतील प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महायुतीमधील तीनही पक्षांचे नेते अतोनात प्रयत्न सुरू आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आल्याने भाजपामधील काही वरिष्ठ पदाधिकारी यांनी पदाचे राजीनामे देत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देत त्यांच्या प्रचारात ते सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मावळातील नेत्यांबरोबर बैठका करत त्यांची मनधारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र वैयक्तिक द्वेषातून ते विरोधात गेले असल्याने त्यांचे माघारी फिरणे जवळपास दुरापास्त झाली आहे.

      जे गेले ते गेले मात्र मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टी ही महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. भाजपचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हा आमदार सुनील शेळके यांच्यासोबत असेल मी स्वतः मावळ तालुक्यामध्ये येऊन कार्यकर्त्यांना महायुतीचा धर्म पाळण्याबाबत व महायुतीचे काम करण्याबाबत सूचना व आव्हान करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना काटे यांच्याशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यामध्ये आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मावळच्या मैदानात उतरणार आहेत. भाजपाचा निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ता हा कोणत्या व्यक्तीच्या मागे न जाता तो पक्षाचा आदेश पाळत महायुतीचा धर्म पाळेल. केंद्रात ज्याप्रमाणे महायुतीचे सरकार आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार व महायुतीचा मुख्यमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हा महायुतीच्या पाठीशी ठामपणे राहील असा विश्वास यानिमित्त व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता मावळ तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्षाचा आदेश पाळणार की मावळ तालुक्यामधील नेत्यांचा आदेश पाळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

     

इतर बातम्या