भांगरवाडी शितळादेवीनगर विभागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मोठा प्रतिसाद

लोणावळा : भांगरवाडी शितळादेवीनगर विभागामध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" शासन मान्य कार्यालयाचा शुभारंभ नुकताच पार पडला. मागील 9 जुलै रोजी सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयामध्ये 400 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी सुमारे 200 माता-भगिनींचे अर्ज योग्य कागदपत्रांसह शासकीय नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने सरकार दप्तरी दाखल करण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यात सर्व्हरचा अडथळा येत असल्याने वेळ लागत आहे.
मावळ माझा न्युज चा वाॅटस्अप ग्रुप जॉईन करा
आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ महिला व माजी शिक्षिका तसेच परिसरातील महिला भगिनी यांच्या हस्ते सदर भांगरवाडी येथील शितळादेवीनगर पाणी टाकी परिसर या ठिकाणी मुख्यमंत्री "माझी लाडकी बहिण योजना" कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे सहकारी दिपकभाऊ मालपोटे तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना माजी सदस्या आणि कुलस्वामिनी महिला मंच सदस्या ज्योतीताई मालपोटे व सहकारी यांनी या विभागातील केन्द्राचे नियोजन आणि आयोजन केले आहे.
या विभागामध्ये विशेष म्हणजे अर्ज भरणे, महिलांकरिता प्रशस्त बैठक व्यवस्था, झेराक्स सोय, तसेच योजने बाबत चे मार्गदर्शन केले जात आहे. आणि अर्ज स्वीकारताच लगेचच ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. हे केन्द्र दिनांक 9 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असून. भांगरवाडी परिसर, नांगरगाव परिसर, व लोणावळा बाजार पेठ व लगतचा ग्रामीण परिसर या सर्व परिसरातील महिलांना व युवतींना या विभागामार्फत सदर शासकीय योजनेचा लाभ घेता येणार आहे.