लोणावळ्यातील भोंडे हायस्कूल व कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या फिरत्या प्रयोगशाळेचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
लोणावळा : विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट संचलित ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमी लोणावळा यांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या फिरती प्रयोगशाळा यांचे उद्घाटन मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आज शुक्रवारी (17 जानेवारी) रोजी करण्यात आले. यानंतर आमदार सुनील शेळके यांनी कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या भव्यदिव्य अशा प्रयोगशाळेला भेट देत तेथील प्रयोगांची माहिती घेतली.
या फिरत्या प्रयोगशाळेचा उद्देश हा स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे आणि तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य तुमच्याकडे आहे याची जाणीव करून देणे हा आहे. डॉक्टर कल्पना चावलाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे घरोघरी विज्ञानेश्वर शाळा, शाळात विज्ञान प्रसार कार्य करून मुलांना विचारशील करणे हा मुख्य उद्देश आहे. कार्यकारण भाव जाणून गोष्ट स्वीकारणे अंधश्रद्धा भीती दूर करून विज्ञान प्रसार करणे हा या विज्ञान फिरत्या प्रयोगशाळेचा उद्देश असल्याचे यावेळी कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे प्रमुख संजय पुजारी यांनी सांगितले.
या फिरत्या वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये 200 विविध वैज्ञानिक प्रयोग असणार आहेत. सदरची वेळ ही संपूर्ण मावळ भागातील जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय यामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगणार आहे. विज्ञान आपल्या दारी ही संकल्पना कल्पना चावला स्पेस अकादमीचे डॉक्टर संजय पुजारी, ॲड. माधवराव भोंडे, राधिका भोंडे, नारायण भार्गव, डॉक्टर पंडित विद्यासागर, डॉ. गंभीर सर यांची असून तिचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या फिरत्या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे.
काय असेल या फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेत
1) मुलांच्या वयोगटांनुसार त्यांना समजतील असे 200 प्रयोग
2) आपली सूर्यमाला यांचे फोटोचे प्रदर्शन
3) रॉकेट स्पेस शटल मानवनिर्मित उपग्रह आपली क्षेपणास्त्रे यांची मॉडेल्स
4) आकाश निरीक्षणाची टेलिस्कोप
5) विविध स्लाईड शो, ज्यामध्ये आपली ग्रहमाला, आपली सजीव सृष्टी, प्राणी, पक्षी, निसर्ग, फुले, फळे, शेती या विषयीचे स्लाईड शो 6) यासाठी प्रोजेक्टर स्क्रीन आणि लॅपटॉप, उत्तम ध्वनी व्यवस्था फिरत्या प्रयोगशाळेतच असणार आहे असणार आहे
7) बाहुली नाट्य पपेट शो
8) जादूचे प्रयोग
9) धम्माल गाणी आणि हसत खेळत विज्ञानाचा शो धम्माल विज्ञानाची
10) विज्ञान ग्रंथालय
11) विज्ञानाचे विविध प्रकल्प
12) पक्षी निरीक्षण आणि निसर्ग वाचन कार्यशाळा
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, माझ्या मावळ मतदारसंघात असा विज्ञानवादी प्रकल्प विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच विविध प्रयोगांचे धडे मिळण्यासाठी, विज्ञानाबद्दल त्यांच्या मनात आवड निर्माण करण्यासाठी ही प्रयोगशाळा म्हणजे एक चांगली संधी आहे. तसेच मावळ तालुक्यातील सगळ्या शाळांसाठी हा उपक्रम उपलब्ध करण्यात आला आहे, ह्याचा मला आनंद आहे. या उपक्रमासाठी लागणारी आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी कल्पना चावला स्पेस अकॅडमी व भोंडे हायस्कूल यांना दिले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव राधिका भोंडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर संजय पुजारी यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे, सचिव राधिका भोंडे, संचालक राजूभाऊ खळदकर, आनंद नाईक, माजी नगरसेवक देविदास कडू, विलास बडेकर, दिपक हुलावळे, बाळासाहेब भानुसघरे, अरुण लाड, ए.के.जोशी, किरण गायकवाड, मंजुताई वाघ, नारायण पाळेकर, आरोही तळेगावकर, मनोज लऊळकर, उमाताई मेहता, शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते अंजुम शेख व तृप्ती गवले यांच्यासह शाळेच्या शिक्षिका शिक्षक, लोणावळा व मावळ तालुक्यामधील विविध मान्यवर उपस्थित होते आदी मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.