Breaking news

ऑल इंडिया रेल्वे रिटायर्ड फेडरेशन लोणावळा यांचे वार्षिक अधिवेशन संपन्न

लोणावळा : ऑल इंडिया रेल्वे रिटायर्ड फेडरेशन लोणावळा यांचे वार्षिक अधिवेशन (AGM) लोणावळा नगर परिषदेच्या डॉ. बाबसाहेब आंबेडकर शाळा येथे दिलीप पवार यांच्या अध्यक्षते खाली सभा पार पडले. यामध्ये रेल्वे रिटायर्ड लोकांच्या अडी अडचणी (तक्रारी) ऐकून त्यांचे निवारण करण्यात आले. तसेच रिटायर्ड झाल्यावर त्यांना होणारा त्रास उदा. मेडिकल, पास, पेन्शन, उम्मिद - कार्ड, मेडिकल - कार्ड, डिये अरियस, व इतर याबाबत माहिती देण्यात आली.

    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एन. हरदर्शन (AGS AIRRF), सुनील कमतान (AIRRF पुणे ब्रंच अध्यक्ष), Dr.Anees (ADMO Lonavala railway hospital कल्याण शाखा), जाडकर (सचिव - Airrf कल्याण शाखा), सोनवणे (Ch. OS), ज्येष्ठ नागरिक संघाचे नामदेवराव डफळ, बबन अनसुलकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, देहुरोडचे पन्नालाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नासीर शेख, उपसरपंच सुरज केदारी, विनायक देशपांडे आदी उपस्थित होते. 

          लोणावळा शाखेच्या वतीने जे सदस्य 80 वर्ष पार केले अशा 12 जणांचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी, पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लोणावळा व इतर ठिकाणावरून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गुरव AIRRF लोणावळा शाखा यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिलीप भाऊ पवार यांनी केले. 

इतर बातम्या