वडगाव शहर भाजपाच्या अध्यक्षपदी अनंता कुडे यांची निवड जाहिर

वडगाव मावळ : वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष व इतर सेलच्या अध्यक्ष निवडी नुकत्याच जाहिर करण्यात आली. यामध्ये वडगाव शहर भाजपा अध्यक्षपदी अनंता कुडे यांची निवड जाहिर करण्यात आली.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, वडगाव शहर प्रभारी शांताराम कदम, युवामोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, तालुका विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, मावळते अध्यक्ष किरण भिलारे, सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहिर करण्यात आली.
याप्रसंगी गुलाबराव म्हाळसकर, सुनील चव्हाण, अँड. तुकाराम काटे, बंडोपंत भेगडे, नारायणराव ढोरे, गोपाळराव भिलारे, वसंतराव भिलारे, नगरसेवक प्रविण चव्हाण, विजय जाधव, गटनेते दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रसाद पिंगळे, शामराव ढोरे, माजी सरपंच नितीन कुडे, संभाजीराव म्हाळसकर, सुधाकर ढोरे, नामदेव वारींगे, रविंद्र काकडे, मनोज बाफना, रमेश ढोरे, शेखर वहिले, संदिप म्हाळसकर, अतुल म्हाळसकर, राजेंद्र उर्फ विकी म्हाळसकर, योगेश म्हाळसकर, विकी म्हाळसकर , भूषण मुथा, संतोष भालेराव, विनय भालेराव आदी उपस्थित होते.
या निवड कार्यक्रमाचे स्वागत रमेश ढोरे यांनी केले तर सूत्रसंचालन रविंद्र म्हाळसकर यांनी केले. नवनिर्वाचित अध्यक्ष अनंता कुडे यांनी सर्वांचे आभार मानले.
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष - अनंता बाळासाहेब कुडे
युवा मोर्चा अध्यक्ष - विनायक रामभाऊ भेगडे.
विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष - प्रज्योत मारुती म्हाळसकर.
अनुसूचित जाती जमाती मोर्चा अध्यक्ष - दिपक नारायण भालेराव.
व्यापारी मोर्चा अध्यक्ष - चेतन मोतीलाल बाफना