Breaking news

पुणे जिल्हा काँग्रेस परिवहन विभागाच्या मावळ तालुका अध्यक्ष पदी अमोल शेडगे यांची नियुक्ती

लोणावळा : पुणे जिल्हा काँग्रेस परिवहन विभागाच्या मावळ तालुका अध्यक्ष पदी लोणावळ्यातील अमोल शेडगे यांची आज नियुक्ती करण्यात आली.

      पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर यांच्या हस्ते आज काँग्रेस भवन पुणे येथे हे नियुक्ती पत्र देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, महाराष्ट्र राज्य काँग्रेस निराधार व निरीश्रित व्यक्ती विकास विभागाच्या अध्यक्षा रधिकाताई मखामले, सरचिटणीस निखिल कवीश्वर अध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस परिवहन विभाग अध्यक्ष मोहसीन तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात काँगेस पक्ष वाढविण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकां पर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे असे यावेळी सांगण्यात आले. 

    अमोल शेडगे हे लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील टॅक्सी चालक-मालक यांचे संघटन करत स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांच्या विरोधात त्यांनी लढा उभारला आहे. लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणच्या स्थानिकांचा व्यवसाय हा पर्यटनावर अवलंबून असतो. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. काँग्रेस पक्षाने मावळ तालुका परिवहन विभागाची जबाबदारी दिल्याने माझ्या या लढ्याला आता अधिकचे बळ मिळेल असा विश्वास अमोल शेडगे यांनी व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेस पक्षाने आपल्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पडत काँग्रेस पक्षाचे विचार व ध्येयधोरणे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली काम करेल अशा भावना देखील व्यक्त केल्या.


इतर बातम्या