Breaking news

अखंड हरिनाम सप्ताह : शिवली गावात श्री दत्तजयंती सुवर्ण महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

पवनानगर (प्रतिनिधी) : शिवली येथे कै. गणपतराव मारुती आडकर यांनी स्थापन केलेल्या श्री गुरुदत्त मुर्तीच्या श्री दत्त जयंती सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त आज शनिवार (दि.3) शनिवार पासून 6 दिवस अंखड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 4 ते 5 काकडा भजन, सकाळी 9 ते 11 गुरुचरित्र पारायण, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 किर्तन, रात्री 9 नंतर हरिजागर अशी दिनचर्या आहे.    

       सप्ताहामध्ये प्रवचनकार ह.भ.प. सुनील महाराज वरघडे, ह.भ.प. जालिंदर महाराज वाजे, ह.भ.प. शामराव महाराज फाळके, ह.भ.प. कालिदास महाराज टिळे, ह.भ.प. महादेव महाराज घारे यांची प्रवचनरुपी सेवा होणार आहे. तर किर्तनकार ह.भ.प. तुषार महाराज दळवी, ह.भ.प. पद्माकर महाराज पाटोळे, ह.भ.प. वैभव महाराज राक्षे, ह.भ.प. पंडित महाराज क्षिरसागर, ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे व आबा महाराज गोडसे यांचे किर्तनरुपी सेवा होणार आहे.

इतर बातम्या