Breaking news

रायवुड ठोंबरेवाडी भागात झाड कोसळले; लोणावळा महाविद्यालयात देखील झाड पडले

लोणावळा : लोणावळा शहरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रायवुड ठोंबरेवाडी भागातील जुना खंडाळा रोडवर एक जंगली झाड पडले आहे. सदरचे झाड हे वीज वितरणच्या तारांवर पडल्याने त्या भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. त्याचप्रमाणे लोणावळा महाविद्यालयात देखील एक झाड पडले आहे. 

    रायवुड ठोंबरेवाडी भागामध्ये सकाळी सहा वाजताच्या दरम्यान हे झाड पडले आहे झाड पडल्याची माहिती समजतात लोणावळा नगर परिषदेचे वृक्ष संवर्धनाचे पथक घटनास्थळावर दाखल झाले असून सदरचे रस्त्यावरील झाड बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. लोणावळा महाविद्यालयाने देखील झाड पडल्या बाबत लोणावळा नगर परिषदेला कळवले असून ते झाड काढून घेण्याची विनंती केली आहे.

इतर बातम्या