Big New : ठाकरवाडी ते मंकीहिल दरम्यान मालगाडी रुळावरुन खाली उतरली

लोणावळा : मुंबई पुणे लोहमार्गावर ठाकरवाडी ते मंकीहिल दरम्यान आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एक मालगाडी रुळावरुन खाली उतरली आहे. डाऊन लेनवर हा घटना घडली आहे. मालगाडी रुळवरुन खाली उतरल्याची माहिती समजताच रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून रुळावरुन खाली उतरलेले डब्बे बाजुला करण्याचे काम करत दुपारी तीन नंतर वाहतूक सुरु केली.