लोणावळ्यात मेरिटास च्या 62 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
लोणावळा : येथील मेरिटास हॉटेल्स, रिसॉर्ट आणि व्हीला व अमृता फौंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (4 सप्टेंबर) आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मध्ये मेरिटास च्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत 62 जणांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचा ही उत्स्फूर्त समावेश होता.
या रक्तदान शिबीराचे आयोजन मेरिटास चे कॉर्पोरेट जनरल मॅनेजर सुशील सर व सेक्युरिटी ऑफिस तसेच अमृता फौंडेशन चे अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी केले होते. मेरिटास च्या सर्व विभागाच्या प्रमुखांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करत हे रक्तदान शिबीर मेरिटास पिकँडल रिसॉर्ट लोणावळा, येथे पार पडले.
यावेळी मेरिटास हॉटेल आणि रिसॉर्ट चे, कॉर्पोरेट जनरल मॅनेजर सुशील सर, जनरल मॅनेजर निखिल परब, गौरव शर्मा, मुकेश वर्मा, संपा हलदर तसेच बालाजी गायकवाड, विनोद दिवाकर, प्रवीण शर्मा, राहुल बोरकर, दयानंद रोकडे व कर्माचारी आदी उपस्थित होते.