Breaking news

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. 01 : आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने मावळ तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या 3 ठिकाणांवर दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत छापे मारून 3 गुन्ह्यांची नोंद करून 1 लाख 44 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

       या कारवाईत 105 लिटर तयार गावठी हातभट्टी दारु, 3 हजार 600 लिटर रसायन व गावठी हातभट्टी दारु निर्मीतीचे इतर साहीत्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही अवैध दारु व्यवसायाविरुद्ध अशाच प्रकारच्या मोहिमा आखून सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नमूद केले आहे.

     या कारवाईत दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि.एम. माने, जवान पी. टी. कदम, एस.एस. पोंधे, ए. आर. थोरात, एस.सी. भाट, आर. टी. तारळकर व महिला जवान यु.आर. वारे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक व्हि. एम. माने व दुय्यम निरीक्षक ए.बी. पाटील करीत आहेत.


इतर बातम्या