Breaking news

राष्ट्रीय सेवक संघ लिखित तीर्थकर भगवान महावीर या मासिक विशेषांकाचे लोकार्पण

मावळ माझा न्युज नेटवर्क : राष्ट्रीय सेवक संघ यांच्या वतीने जैन धर्मीयांच्या तिर्थकर भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या तीर्थकर भगवान महावीर या हिंदी मासिक विवेक विशेषांकाचे लोकार्पण मंगळवारी (23 एप्रिल) घाटकोपर येथील पारसधाम मध्ये राष्ट्रसंत नम्रमुनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. 

      पद्मश्री रमेश पतंगे अध्यक्ष हिंदुस्तान प्रकाशन संस्था यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमास भाजपा उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल, राष्ट्रीय सेवक संघाचे हिंदी विवेक याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर, समस्त महाजन संस्था यांचे ट्रस्टी परेशभाई शहा, आमदार पराग भाई शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सदर प्रकाशनाच्या वेळी हजाराच्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते.

      यावेळी बोलताना राष्ट्रसंत नम्रमुनी यांनी सांगितले की, राष्ट्रीय सेवक संघ यांनी भगवान महावीर बाबत केलेला अभ्यास व हिंदू समाजातील प्रत्येक जातीतील धर्मांना एकत्र करण्याचा केलेला प्रयत्न हे त्यांचे कार्य मोठे आहे. हिंदू धर्म विविध जाती धर्मामध्ये विखुरलेला असून त्यांना एक करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय सेवक संघ करत आहे. सर्व हिंदू धर्म एक झाल्यास संपूर्ण जगामध्ये अहिंसा व सत्य याच्या प्रसार होईल. संपूर्ण विश्वामध्ये शांती लाभेल असे सांगितले. सर्व प्रमुख पाहुण्याच्या सत्कार  राष्ट्रसंत नम्रमुनी यांच्या हस्ते करण्यात आला.

इतर बातम्या