Breaking news

Maval News : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

वडगाव मावळ : उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांनी दिली.

वडगाव नगरपंचायतीने 'स्वच्छ सर्वेक्षण - 2023 मध्ये सहभाग घेतला असून स्वच्छ व सुंदर शहर बनवण्यासाठी विविध विकास कामे सुरू आहेत. उपनगराध्यक्षा म्हाळसकर यांनी गुरुवारी शहरातील सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. या वेळी परिसरात उघड्यावर कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले. अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्यामुळे गावच्या सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बेशिस्तीला पायबंद घालण्यासाठी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी नगरपंचायतीच्यावतीने कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात येणार असल्याचे म्हाळसकर यांनी सांगितले.

इतर बातम्या