Breaking news

KHOPOLI : राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीतील स्पर्धकांना अभूतपूर्व यश; 8 पदकांची कमाई

खोपोली (गुरुनाथ साठेलकर) : औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोली मधील स्पर्धकांनी अभूतपूर्व असे यश संपादन करत तब्बल आठ पदकांची कमाई केली आहे.

    यामध्ये सिनियर गटात योगेश पुजारी, दिनेश पवार, प्रीतम मंडल यांनी सुर्वण पदक, अक्षय शनमुगन, योगेश पुजारी, कृणाल  पिंगळे, श्रुती हनुमंत मोरे यांनी रौप्य पदक पटकाविले. तर ज्युनियर गटात शुभम कंगळे याला कांस्य पदक मिळाले. स्पर्धकांच्या या यशाचे खोपोलीकरांनी कौतुक केले आहे.

      सर्व यशस्वी खेळाडू येत्या काही दिवसात गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय आणि त्यानंतर हॉंगकॉंग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रयत्न आणि सराव करत आहेत. खोपोलीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या या खेळाडूंचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

इतर बातम्या