Breaking news

कार्ला परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी जेई प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम संपन्न; 15 वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश

कार्ला : जॅपनीज इन्सेफलायटीस (जेई) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम 2025 प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला असून मावळातील सर्व अंगणवाडी केंद्रे, शासकीय व खासगी शाळाअंतर्गत एक वर्ष ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना हे लसीकरण करण्यात येत आहे. कार्ला परिसरातील शाळे मधील 3152 विद्यार्थ्यांना कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रा कडून मुलांचे लसीकरण केले  आहे.

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, तालुका आरोग्य अधिकारी

डॉ. शॅरन सोनवणे, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरु आहे. 

      या मोहिमेचे उद्घाटन कार्ला सरपंच दिपाली हुलावळे, मुख्याध्यापक संजय वंजारे, लक्ष्मीकांत घोंगडे यांच्या उपस्थितीत एकविरा विद्यालयात करण्यात आले. कार्ला आरोग्य अधिकारी नितीन वाघमारे, दत्ता तापसे, लक्ष्मीकांत घोंगडे, अपूर्वा क्षीरसागर, चेतन पवार, निकिता मारोडे, दीपिका मुकदम, अनुराधा शिंदे, पूजा रणदिवे, श्री विरनाक, एम कॊरव, श्रीमती नागमनी, सुशीला जावळे, श्री ठोंबरे आदींसह सर्व केंद्र प्रमुख, सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, परिचारिका, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.

जेई म्हणजे काय ?

जॅपनीज इन्सेफलायटीस (जेई) हा आजार 15 वर्षांखालील बालकांमध्ये आढळून येतो. या आजारात सुमारे 70 टक्के रुग्ण मृत्यूमुखी पडतात किंवा त्या रुग्णामध्ये दीर्घकालीन

जेईची लागण अन् लक्षणे

■ संक्रमित कुलेक्स डासांच्या चावण्यामुळे लागण

■ खूप ताप येणे, डोकेदुखी, हातपाय आकडणे

■ उदासीनता, बेशुद्ध होणे, अर्धांगवायू, आकडी येणे

न्यूरोलॉजिकल अक्षमता आढळून येतात. या आजारावर दीर्घकाळ नियंत्रण घालण्यासाठी जेइ लसीकरण हा एकमेव पर्याय आहे.

इतर बातम्या