Breaking news

श्री एकविरा देवी चैत्री उत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर गड परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे : श्री एकविरा देवी चैत्री उत्सव 2025 निमित्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 30 मार्चच्या मध्यरात्री 12 पासून 6 एप्रिलच्या रात्री 12 पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 मधील कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

प्रतिबंधित कृती :या कालावधीत गड परिसरात खालील गोष्टींना बंदी घालण्यात आली आहे —

✔ फटाके व शोभेची दारू नेणे व फोडणे

✔ वाद्ये, ढोल-ताशे वाजविणे

✔ एकसारख्या रंगाचे कपडे किंवा टी-शर्ट परिधान करणे

✔ कोंबडे, बकरे किंवा अन्य पशु-पक्ष्यांचा बळी देणे व त्यांना मंदिर परिसरात सोडणे

✔ कार्ला लेणी व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान किंवा विद्रूपीकरण करणे

        या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधान संहिता कलम 188 नुसार कारवाई होणार आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून भक्तीमय आणि सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


इतर बातम्या