Breaking news

अगाऊपणा नडला; जुन्या खंडाळा घाटात टेम्पो आडकला हाईट बॅरिकेट्स मध्ये

लोणावळा : खंडाळा घाटातील जुन्या मुंबई पुणे हायवे वरून जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी अडीच मिटर उंचीचे हाईट बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. असे असताना देखील अनेक वाहन चालक अंतर वाचवण्यासाठी या हाईट बॅरिकेट्स च्या खालून वाहने घेऊन जातात. असाच एक प्रकार आज देखील घडला. मागील काळात अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. वेळोवेळी याबाबत जनजागृती देखील करण्यात आली आहे. तरी देखील आज सकाळी एक टेम्पो चालक हा जबरदस्तीने या हाईट बॅरिकेट्स च्या खालून वाहन घेऊन जाताना टेम्पो आडकला असून त्याचा दर्शनी भाग हवेत गेला आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक वेळा अशा दुर्घटना मध्ये हाईट बॅरीकेट्स चे नुकसान देखील झाले आहे.

इतर बातम्या