Breaking news

Crime News : येळसे गावात चोरी; साडेचौदा लाखांचा ऐवज लंपास

लोणावळा : पवनानगर परिसरात येळसे गावातील एका बंद घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करत घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे 14 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. 1 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 ते पहाटे 6.55 दरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी मुकूंद ठाकर यांनी चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. 

     लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकूंद ठाकर हे घरी नसताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा कटावणीने उचकटून घरात प्रवेश करत घरातील 5 लाख रूपये रोकड व सोन्याचे दागिने असा 14 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

     घटनेची माहिती समजताच लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी फिर्याद दाखल करत घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. लवकरच आरोपी अटक करू असे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कारंडे हे करत आहेत.

इतर बातम्या