Breaking news

Missing News l मावळ तालुक्यातील बोरज गावातून पंधरा दिवसांपूर्वी महिला दोन मुलींसह बेपत्ता; शोध लागत नसल्याने पती हवालदिल

लोणावळा : मावळ तालुक्यातील बोरज गावातून पंधरा दिवसांपूर्वी एक महिला तिच्या दोन लहान मुलींसह बेपत्ता झाली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी तिच्या पतीने मिसिंग फिर्याद दाखल केली आहे. या घटनेला पंधरा दिवस उलटले तरी देखील पत्नीचा व दोन्ही मुलींचा शोध लागत नसल्यामुळे पती हवालदिल झाला आहे.

     शशिकांत रघुनाथ बेल्हेकर ( राहणार बोरज, मूळ राहणार देवले, तालुका मावळ, जिल्हा पुणे) यांची पत्नी सपना शशिकांत बेल्हेकर ह्या 26 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता बोरज येथून देवले गावात रेशन चालू करण्यासाठी जाते व उद्या परत बोरज ला येईल असे शशिकांत बेल्हेकर यांना सांगत दोन मुली अनुक्रमे सृष्टी वय साडेतीन वर्ष व शिवकन्या वय दोन वर्ष यांच्यासह घराबाहेर पडल्या, त्या घरी न आल्याने 27 मे रोजी रात्री उशिरा या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

        पंधरा दिवस उलटले तरी या मिसिंग प्रकरणाचा कोणताही तपास लागत नसल्यामुळे पती शशिकांत बेल्हेकर हे हवालदील झाले आहेत. सर्व नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे चौकशी केली मात्र सपना बेल्हेकर व मुली यांचा कोठेही तपास लागला नसल्याचे शशिकांत बेल्हेकर यांनी सांगितले. सदरची घटना घडल्यानंतर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका रिक्षामध्ये त्या बसून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली असल्याचे शशिकांत बेल्हेकर यांनी सांगितले.

इतर बातम्या