Accident News l आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळली; 8 जणांचा जागीच मृत्यू
लोणावळा : कोकणातील पर्यटन दौरा उरकून साताऱ्याच्या दिशेने जाणारी एक स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटातील दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज सोमवारी पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH 11 DN 2340 ही आठ प्रवाशांसह कोकणातून साताऱ्याच्या दिशेने आंबेनळी घाटातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर गाडी आंबेनळी घाटातील दरीत सुमारे 1200 फूट खोल पडली. या भीषण अपघातात गाडीतील सर्व आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. मयत सर्वजण हे सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील रहिवाशी होते.
आंबेनळीचा मार्ग अवघड वळणाचा व घाट चढण उताराचा आहे. असे या मार्गावरून मध्यरात्रीनंतरच्या सुमारास प्रवास करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले नाही गाडी थेट खोल दरीमध्ये पडल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, सह्याद्री ट्रेकर्स अशा विविध रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. काळोख्या रात्री मध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवत मृतदेह बाहेर काढण्याचे काम करत होत्या. पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी रात्री अप रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा. अवघड वळणे व घाट परिसरातून प्रवास करताना वाहन मर्यादित वेगाने चालवावे असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





















