Breaking news

Maval News l मावळात वाढत्या अंमली पदार्थ आणि अवैध धंद्यांविरुद्ध मनसे आक्रमक; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

लोणावळा : मावळ तालुक्यात गेल्या काही काळापासून ड्रग्स, एम.डी. पावडर, गांजा आणि गुटख्यासारख्या अंमली पदार्थांची विक्री तसेच गावठी दारूचे धंदे खुलेआम सुरू आहेत. या वाढत्या अवैध धंद्यांवर तात्काळ कडक कारवाई करून ते पूर्णपणे बंद करावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलिस प्रशासन आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या अनधिकृत धंद्यांवर वेळीच लगाम न घातल्यास मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे यांनी दिला आहे.

अवैध व्यवसायांमुळे जनजीवन विस्कळीत

मावळ तालुक्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यापारामुळे तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चालली आहे. या गंभीर प्रकारांसोबतच जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वेश्या व्यवसायही सुरू आहेत. या परिसरातील अवैध कृत्यांमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशासनाला इशारा

मनसेच्या शिष्टमंडळाने पोलिस अधिकारी आणि तहसीलदार यांची भेट घेऊन या सर्व अवैध धंद्यांची सविस्तर माहिती दिली. हे व्यवसाय त्वरित बंद न केल्यास प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक पवित्राचा सामना करावा लागेल, असे बजावण्यात आले आहे. प्रशासनाने यावर कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

        निवेदन देताना मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे, सचिन भांडवलकर, मोजेस दास, निरंजन चव्हाण, सुनिल सावळे, अनिल लालगुडे, विशाल लोंढे, संतोष खराडे, निखिल भोसले, अमित भोसले, राहुल मांजरेकर, दिपक सोनावणे, आकाश पारखी, जॉर्ज दास, रजनी गायकवाड, अभिजीत फासगे, दिनेश कालेकर, राजू भंडारी, निर्मल आंबेकर, नाथा पिंपळे, डॉमनिक दास, आकाश सावंत, जुबेर मुल्ला, ज्ञानेश्वर वाळुंजकर आणि गणेश घोलप यांसह अनेक महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या