मटन व चिकनच्या दुकानातून 9 बोकड चोरणाऱ्या दोघांना तळेगाव पोलिसांनी 24 तासात घेतले ताब्यात

मावळ माझा न्युज नेटवर्क : 4 जानेवारी रोजी रात्री साडेदहा ते पाच जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान वराळे फाटा येथील महाराष्ट्र मटन आणि चिकन शॉप या दुकानातील 9 बोकड व 1 सिलेंडर याची चोरी करणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांवर 24 तासात ताब्यात घेतले आहे.
मिलन सुकतार शेख (रा.वराळे फाटा ता.मावळ जि पुणे) याने त्याच्या महाराष्ट्र मटन व चिकन या दुकानांमधील नऊ बोकड व एक गॅस सिलेंडर कोणीतरी चोरी करून नेले असल्याचे फिर्याद तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी दोन टिम बनवुन तपास करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, 1 व्यक्ती वडगाव मावळ येथे बकऱ्या विकण्यासाठी येणार आहे.
त्या माहितीच्या आधारे तपास पथक वडगाव मावळ या ठिकाणी गेले असता एका दुचाकी गाडीवरून दोन व्यक्ती एक बोकड घेऊन आल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, सदरचा बोकड हा वराळे फाटा येथून चोरला असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक तपासामध्ये बाकीचे आठ बोकड व सिलेंडर हे देखील त्या दोघांच्या घरामध्ये मिळून आले आहेत तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली. ओमकेश लक्ष्मण मदंलपवाड (वय 21) व पकंज श्रावण गौड (वय 21 दोघेही रा.वराळे फाटा ता.मावळ) अशी त्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोवारीकर, पोलीस हवालदार अनंत रावण, पोलीस शिपाई खिलारे व पोलीस शिपाई साठी यांच्या पथकाने ची कारवाई करत 24 तासात गुन्हा उघडकीस आणला आहे.