Breaking news

Expressway Accident : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मुंबई लेन किलोमीटर 38 येथे पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास झाला.

      मिळालेल्या माहितीनुसार वरील ठिकाणी ट्रक क्र. (MH 43 Y 9455) वरील चालक बाळू नामदेव मेटे (वय 57 रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) हे कराड येथून नवी मुंबईकडे जात असताना रस्त्यालगत थांबला होता. त्यावेळी त्यांचा मुलगा तथा क्लिनर राहुल बाळू मेटे, (वय 26) हा सदर ट्रकच्या उजव्या बाजूस टायर मधील हवा चेक करण्याकरता उतरला होता. त्याच वेळी मागून येणारा ट्रेलर क्रमांक (MH 46 BM 3701) ची त्याला जोरात जोराची धडक बसली. त्यामुळे तो ट्रेलर खाली येऊन जागीच  मयत झाला. ट्रेलर चालक विनोद गौड याने जोरात ब्रेक लावल्याने ट्रेलर वरील अंदाजे वीस वीस टन वजनाच्या दोन लोखंडी कॉईल चैन लॉक तुटून निसटून ट्रेलरच्या केबिन वरून एक्सप्रेस वेच्या पहिल्या आणि तिसऱ्या लेनवर पडल्या. सुदैवाने कॉईलचा धक्का इतर कोणत्याही वाहनास लागला नाही. मात्र दुर्दैवाने ट्रेलर चालक विनोद गौड हा केबिनमध्ये दबला आणि अडकून पडल्याने जागीच मयत झाला. 

      अपघात  घडल्याची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्सचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी, मृत्युंजय देवदूत, लोकमान्य  हॉस्पिटल निगडीच्या रुग्णवाहिका आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी मदत कार्य करून मृतदेह बाहेर काढले. बाधित वाहने तसेच कॉईल हटवून काही वेळ ठप्प झालेली वाहतूक मोकळी केली. याप्रकरणी अधिक तपास खोपोली पोलीस करत आहे.

इतर बातम्या