Breaking news

गुरुकुल हायस्कूलमध्ये शिवसेना परिवाराच्या वतीने वृक्षारोपण; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'वृक्ष पंधरवडा' उपक्रम

लोणावळा : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'वृक्ष पंधरवडा' उपक्रमांतर्गत लोणावळा शिवसेना परिवाराच्या वतीने तुंगार्ली येथील गुरुकुल हायस्कूलमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

पर्यावरणाचा समतोल राखणे आणि हरित निसर्गाचा संदेश देणे या उद्देशाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसेना नेते व पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शाळेचे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रवीण काळे, ज्येष्ठ विभागप्रमुख वसंत ढोरे, शंकर जाधव, मनोज मेहता, उपविभागप्रमुख नितीन काळे, संदीप लोखरे, माजी विभागप्रमुख सुनील इंगुळकर, वाहतूक सेनेचे तालुका संघटक दिनेश वीर, तसेच युवा सेनेचे अजय ढम, अभिषेक इंगुळकर आणि बाळा तिकोने यांनी सक्रीय सहभाग घेतला. गुरुकुल विद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक बयाजी खुरंगे, पर्यवेक्षक सुजित सूर्यवंशी, शिक्षक भूषण शिरोडे, दिनेश पाटील, दीपक मावकर, औटी मॅडम, मीनल पानसरे आणि औरंगे मॅडम यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले. यावेळी परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली असून, लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.

इतर बातम्या

कर्ज देण्याच्या बहाण्याने बुटाला परिवाराने आमच्या घराचे खरेदीखत केल्याचा रांगणे परिवाराचा आरोप; कायदेशीर दस्तेवज करून घर विकत घेतल्याचा बुटाला परिवाराचा खुलासा

ठोंबरेवाडी लोणावळा येथील बंगल्यातील माळ्यातला घराबाहेर काढण्यासाठी बाऊन्सरचा वापर; नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सकाळपासून पोलीस ठाण्यात ठिय्या तरी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ