Maval News l कोट्यवधी रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालय उभे राहिले मात्र सांबा च्या आडमुठेपणामुळे डॉक्टर ताबा घेईना !

मावळ माझा न्युज नेटवर्क : कोट्यावधी रुपये खर्च करून कान्हे येथे उपजिल्हा रुग्णालयाची ईमारत उभी राहिली. 4 आक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन झाले. मात्र या ईमारतीचे किरकोळ काम बाकी असल्याने या इमारतीचा ताबा घेण्यास डाॅक्टरांनी दिला नकार. सार्वजनिक बांधकाम विभाग काम करेना अन् डाॅक्टर ताबा घेईना त्यामुळे कोट्यावधी रुपयांची इमारत होऊनही रूग्ण प्रतिक्षेत आहेत.
मावळ तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक, महिला यांना मोफत उपचार मिळावा. खेड्या पाड्यातील रूगणांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आमदार सुनील यांच्या प्रयत्नातून कान्हे फाटा येथे जिल्हा उप रूग्णालयाची सुज्ज इमारत बांधण्यासाठी 44 कोटी रुपये मंजूर झाले. इमारत देखील उभी राहिली. विधानसभा निवडणुकी अगोदर या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांनी महा आरोग्य शिबीर घेतले. या शिबिरात लाखो नागरीकांना फायदा झाला. 4 आक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या इमारतीचे उदघाटन देखील झाले.
सार्वजनिक बांधकाम विभाग काम करेना, डाॅक्टर इमारतीचा ताबा घेईना
44 कोटो रूपये खर्च करून इमारत उभी राहिली, बेसमेंट पार्किंगला शटर बसविणे, एक पॅनल चेंज करणे, औषध रूमच्या खिडकीला काच बसवणे यासह अन्य किरकोळ कामे होणे बाकी असल्याने इमारतीचा ताबा घेण्यास डाॅक्टरांनी नकार दिला आहे.
{आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने जिल्हा उप रूग्णालयात उभे राहिले. त्याचा फायदा नागरीकांना होणारच आहे. या इमारतीचे किरकोळ काम बाकी आहे ते काम त्वरीत करून द्यावे, यासाठी डिसेंबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले, मात्र त्यांनी काम पूर्ण न केल्याने आम्ही इमारतीचा ताबा घेतलेला नाही. कारण रूग्णालय सुरू झाले तर अडचण नको - डाॅक्टर बी आर पाटील - वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय}