Breaking news

रायवुड लोणावळा येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचा लोकार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा; 16 ते 23 मे दरम्यान संपन्न होणार


लोणावळा : लोणावळा शहरातील रायवुड येथे श्री सिद्धीविनायक गणेश मंदिर जिर्णोध्दार लोकार्पण व मूर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोहळा 16 मे ते 23 मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या निमित्त पं. आतुल शास्त्री भगरे गुरूजींच्या श्रीमत् भागवत कथेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. गणेश मंडळाचे 99 वे वर्षे आहे. या वर्षाच्या गणेश उत्सवा पासुन पुढील शताब्दी महोत्सव मंडळाच्या वतीने साजरे करण्यात येणार आहे. शताब्दी वर्षाचे औचत्य साधुन मंडळाच्या कार्यकत्यांनी जुण्या जिर्ण झालेल्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा संकल्प केला होता ती पूर्णत्वास गेला आहे.

      मंडळाचे आधारस्तंभ मावळ तालुक्याचे लोकनेते आमदार श्री. सुनिलआण्णा शेळके यांच्याकडे मंदिर जिर्णोद्धार कार्याचा संकल्पीत आराखडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केला. आमदार महोदयांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवली, त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंदिर बांधण्यासाठी कार्यास बळ मिळाले. पुढे कार्यर्त्यांनी परिसरातील प्रत्येक घरातून लोक वर्गणी जमा केली. तसेच परिसरातल्या व्यवसाईक, सामाजिक संस्था, उद्योजक यांजकडून आर्थिक मदत मिळाली. मंदिराच्या कामास दिड वर्षापुर्वी सुरूवात झाली होती. आमदार शेळके यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या या कामास रायवुड परिसरातील बांधकाम व्यावसायिक दिनेश राणावत यांचे मोलाचे योगदान मिळाले. तसेच लोणावळा शहरातील प्रसिद्ध वास्तुविशारद गौरव भांगरे पाटील यांनी मंदिराचे पुरातन आठवणी कायम ठेवत मंदिराचे डिझाईन करून प्रत्यक्षात काम कारागीरांन कडून करून घेतले.

      स्थानिक बंगले मालक, देणगीदार, अनेक दानशुर व्यक्तीं तसेच ग्रामस्थ यांनी देखील मोलाचे सहकार्य केल्यामुळे मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम यशस्वी रित्या पार पडले. हे मंदिर अत्यंत आकर्षक व सुंदर झाले असुन भाविकांच्या मनाला समाधान देणारे ठरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक माळी कामगारांकडून या गणेश मंडळाची स्थापना सन 1927 साली करण्यात आली. लोणावळा शहरातील मानाचा पहिला सार्वजनिक गणेशउत्सव म्हणून हे मंडळ उदयास आले. पुढे यांच माळी कामगारांची चौथी पिढी शिक्षणातुन व उद्योग व्यवसायातु स्वतःची प्रगती साधत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. त्यांनी स्वबळावर येथ मंदिराच्या आर्थिक आड-अडचणीवर मात  करत मंडळाला नावारूपाला आणले. 

          श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या कार्य उभारणीसाठी रायवुड भागातील तरुणांनी मोठ्या उत्साहाने, मेहनतीने, एकोप्याने सहभाग घेऊन नवा आदर्श घालुन दिला आहे. श्री गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठापना, जिर्णोद्धार कार्यपूर्ती लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने व शताब्दि महोत्सवाचे औचित्य साधून 'झी' टिव्ही चॅनल वरून दररोज भविष्यवाणीचे वार्तांकन करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्रीमत् भागवत कथाकार पं. आतुल शास्त्री भगरे गुरूजी यांची 16 ते 22 मे दरम्यान दररोज सायंकाळी 05 ते रात्री 09 या वेळेत श्रीमत् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

      त्यानिमित्ताने शुक्रवार दि. 16 मे रोजी सकाळी 10 वाजता श्रीराम मंदिर भांगरवाडी येथुन रायवुड येथे श्री सिद्धीविनायक गणेश मंदिरापर्यंत कथावक्ते पं. अतुलशास्त्री भगरे गुरूजींच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसाची मिरवणूक नवमी भजनी मंडळ, लोणावळा यांच्या उपस्थितीत भजन व टाळांच्या गजरात निघणार आहे. या प्रसंगी परिसरातील सर्व महिला भगिनी पारंपारिक वेशात डोक्यावर कलश घेऊन, तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते पारंपारिक वेशभुषेत मिरवणूकीत सहभागी होणार आहेत. 

दि. 21 मे, ते 23 मे 2025 पर्यंत पंचकुंडी यज्ञ होमहवन 21 ब्राम्हणवृंदांच्या उपस्थितीत व 45 जोडप्यांच्या उपस्थित होणार आहे.

       शुक्रवार दि. 23 मे 2025 रोजी मुख्य मंगलमुर्तीची प्राणप्रतीष्ठा दुपारी 12 ते 03 च्या वेळेत मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या हस्ते होणार आहे. तसेच श्री संत संजयगीरीजी महाराज उर्फ लहरीबाबा यांच्या शुभहस्ते मंगलाचे कळस रोहन होणार आहे मावळ-मुळशी भुषण, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बाबुजी उर्फ नंदुभाऊ सोनु वाळंज व उद्योजक बांधकाम व्यवसायिक दिनेश राणावत यांच्या शुभहस्ते मंदिर वास्तुशांती व ध्वजस्तंभ पुजन तसेच ध्वजरोहन होणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.

इतर बातम्या