SSC RESULT l लोणावळा परिसरातील 13 शाळांचा निकाल शंभर टक्के

लोणावळा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये लोणावळा परिसरातील 11 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सर्व शाळांमध्ये प्रथम तीन मध्ये येण्याचा मान मुलींनी मिळविला आहे.
100% निकाल लागलेल्या शाळा :
डीसी हायस्कूल खंडाळा, डॉन बॉस्को हायस्कूल तुंगार्ली, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल रायवुड, लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा, आंतरभारती बालग्राम शाळा भुशी, ऑल सेंट चर्च शाळा बारा बंगला, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल तुंगार्ली, श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला, तुंग माध्यमिक विद्यालय, तुंगी, सोजल माध्यमिक विद्यालय कुरवंडे, जिल्हा परिषद शाळा कुणेनामा, ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल भांगरवाडी लोणावळा, लीली इंग्लिश मिडीयम स्कूल, संपर्क संस्था
लोणावळा शहरातील इतर शाळांचा निकाल :
व्ही पी एस हायस्कूल गवळीवाडा - 99.04%,
डॉ. बी एन पुरंदरे बहुविध विद्यालय लोणावळा - 95.04%, लोणावळा नगरपरिषद शाळा खंडाळा - 58.82%, स्वर्गीय वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय देवघर - 56.95%, शांती सदन स्कूल रायवुड - 92.30%, लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक शाळा - 90%, नागनाथ विद्यालय औंढे - 70%, श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली 90.90 %