प्रकाश पोरवाल यांचा महाराष्ट्र गोरक्षक आयोगातर्फे सत्कार

मावळ माझा न्युज नेटवर्क l महाराष्ट्र गोरक्षक आयोगाच्या वतीने आज 14 मे रोजी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांचा त्यांच्या गोरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गोरक्षक आयोगाचे अध्यक्ष तथा राज्य मंत्री श्री. शेखर मुंदडा, आयुक्त श्रीमती पुंडलिक मॅडम, तसेच आयोगाचे इतर सदस्य उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री. शेखर मुंदडा म्हणाले की, “संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरक्षणासाठी झटणाऱ्या समस्त महाजन संस्थेच्या कार्यात प्रकाश पोरवाल यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे गोरक्षणाचे जतन होत असून, शेतकऱ्यांमध्ये शेण व शेती आधारित उद्योग निर्माण करण्याबाबत मोठी जनजागृती होत आहे.” याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
सत्कार स्वीकारताना प्रकाश पोरवाल यांनी सांगितले की, “गायीच्या शेणापासून विविध प्रकारचे उपयोगी पदार्थ तयार करता येतात. मात्र, महाराष्ट्रात अजूनही या बाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. मी संपूर्ण राज्यभर या विषयावर काम करत असून, अनेक शेतकरी बांधव यात सहभागी होत आहेत. भविष्यात शेणावर आधारित मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहू शकतात.” कार्यक्रमाच्या शेवटी आयुक्त श्रीमती पुंडलिक मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.