Breaking news

Ganesh Festival : सोन पावलांनी घरोघरी गौराई मातेचे आगमन

लोणावळा : सोन पावलांनी आज घरोघरी लाडक्या गौराई मातेचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. सकाळपासूनच लोणावळा शहर व ग्रामीण भागात तसेच संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये गौराईच्या आगमनाची लगबग सुरू होती. विशेषतः महिलांकडून डोंगर भागांमधून येणारी गौराईची फुले यांची साफसफाई व पूजन करत त्यांची दुपारनंतर घरामध्ये स्थापना करण्यात आली. सोबतच नानाविध प्रकारच्या गौराईंची घरोघरी स्थापना करण्यात आली आहे. महिलांनी अतिशय आकर्षक पद्धतीने गौराईची स्थापना केली आहे. काही ठिकाणी कमळावर गौराई बसवण्यात आली आहे तर काही ठिकाणी जात्यावर दळण दळणारी गौराई, हातामध्ये सूप घेऊन धान्य स्वच्छ करणारी गौराई, काही ठिकाणी दुचाकी गाडीवरून आलेली गौराई, काही ठिकाणी झोपाळ्यावर बसलेली गौराई अशी नानाविध रूपे आज पाहायला मिळत आहेत. लाडक्या गौराई साठी दिवाळीमध्ये बनवतो अशा पद्धतीने सर्व फराळ बनवण्यात आला असून त्याची उत्कृष्ट पद्धतीने मांडणी गणपती गौराईच्या समोर करण्यात आली आहे. नानाविध प्रकारची मिठाई देवीच्या प्रसादासाठी ठेवण्यात आली आहे अतिशय मनोभावे देवीची पूजा आमच्या करत आज घरोघरी गौरीची स्थापना करण्यात आली. उद्या गौराईचे पूजन होणार असून शनिवारी घरगुती गणपती व गौराईचे विसर्जन केले जाणार आहे.

इतर बातम्या