Breaking news

तळेगाव पोलिसांची काळ्या फिल्मिंग असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई मोहिम

मावळ माझा न्युज : तळेगाव वाहतूक विभागाअंतर्गत विशेष मोहीम म्हणून सलग आठवडाभर तळेगाव चाकण रोडवर चार चाकी गाड्यांवर ब्लॅक फिल्म ची कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाईत आजपर्यंत 86 चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर गाड्यांचे ब्लॅक फिल्म काढून टाकण्यात आली आहे. तसेच वाहनांवर वर्षानुवर्ष थकीत असलेला दंड भरून घेतला जात आहे. जे वाहन चालक वर्षानुवर्ष आपल्या वाहनांवरील दंड भरत नाही, दंड भरण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यावर यापुढे खटले दाखल करून  कारवाई करण्यात येणार आहे.

       तळेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी विशाल अशोक गजरमल, पोलीस उपनिरीक्षक पोटे व स्टाफ यांनी सलग कारवाई केल्यामुळे तळेगाव दाभाडे शहरात ब्लॅक फिल्म कार रस्त्यावर फिरण्याच्या बंद झाल्या आहेत. तसेच वाहतूक पोलिसांचा रोडवरील प्रेझेंस वाढल्याने बेशिस्त वाहन चालकांवर व वाहतूक कोंडीवर आळा बसला आहे.

इतर बातम्या