Breaking news

Subash Pujari : मि. एशिया बाॅडी बिल्डिंग स्पर्धेत "ही मॅन" ठरले "गोल्ड मॅन"

खोपोली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी मि.एशिया बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन 2022 मधे गोल्ड मेडल मिळविले आहे. 54 व्या "मिस्टर एशिया बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन - 2022" या मालदीव येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत 80 किलो वजनी गटात सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावून आपल्या विजयाचा रथ दौडत ठेवला आहे. आता सुभाष पुजारी हे विश्व विजेते पद पटकवण्यासाठी तयारीला लागले असून, त्यांनी आता पर्यंत ज्या क्रमाने एक एक टप्पा पार करत "मिस्टर एशिया" हा बहुमान प्राप्त केला आहे तो पाहता ते "विश्व विजेते" ठरणारच असा विश्वास त्यांचे प्रशिक्षक आणि प्रशंसकाना वाटू लागलाय. महाराष्ट्र पोलीस दलाची आणि महाराष्ट्र राज्याचीच नव्हे तर भारताची मान उंचावणारा मिस्टर एशिया हा बहुमान प्राप्त केल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील वाहतूक विभागाचे निरीक्षक सुभाष पुजारी हे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे देखील सदस्य आहेत. त्यांच्या या विजयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

इतर बातम्या